लातूर जिल्ह्यात रेणापूरचे ग्रामीण रुग्णालय सर्व सोयीनियुक्त सुसज्ज करणार–आ. कराड
लातूर दि.०६- रेणापूर येथे कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधा नसल्याने अपत्कालीन रुग्णांना इतरत्र जावे लागते. ग्रामीण जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेवून रेणापूरचे ग्रामीण रुग्णालय सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.आ. रमेशअप्पा कराड यांनी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयास शनिवारी सकाळी अचानकपणे भेट देवून पाहणी केली. रुग्णालयात कार्यरत असलेले तपासणी कक्ष, क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, महिला व पुरुष रुग्णांचे वार्ड, लसीकरण कक्ष, औषध वितरण विभाग, प्रसुती गृहासह सर्व विभागाची पाहणी करून ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कर्नावट यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर नोंदणी विभाग दैनंदिन रुग्णांची संख्या याबाबतची तपासणी करून चर्चा केली. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या बेड मध्ये शासनाच्या नियमानूसार सुरक्षित अंतर नसल्याने त्याचबरोबर शासकीय रुग्णालय असूनही येथे छपाई केलेली साहित्य वापरात नसल्याने आ. कराड यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांनी आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून कर्तव्य केले पाहिजे सुविधा देण्यात कमी पडतोय म्हणून रुग्ण येत नाहीत त्यांना नाईलाजास्तव इतरत्र जावे लागते असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, रेणापूरच्या या ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण विभागासह अनेक त्रुटी आहेत. सुविधांचा मोठा अभाव आहे येत्या काळात लातूर जिल्ह्यात रेणापूरचे ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण सेवेसाठी चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी सर्व अत्याधुनिक सोयीनियुक्त रुग्णालय निर्माण करण्यासाठी सर्व तो परीने मदत करू. ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी मदत करू ज्या सुविधांचा अभाव आहे त्याचा परिपूर्ण प्रस्ताव द्यावा शासन दरबारी मंजूर करून घेण्याची माझी जबाबदारी राहिल असे ही बोलून दाखविले.आ. रमेशअप्पा कराड यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामीण रुग्णालयास भेट दिल्याने रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कर्नावट यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी रुग्णालयातील डॉ. तांदळे, डॉ. शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आ. कराड यांच्यासमवेत भाजपाचे विधानसभा प्रमुख अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, पसचे सभापती रमेश सोनवणे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूरच्या नगराध्यक्षा सौ. आरती राठोड, उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, डॉ. बाबासाहेब घुले, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, वसंत करमुडे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, लक्ष्मण खलंग्रे, श्रीकृष्ण पवार, विठ्ठल कसपटे, शिवमूर्ती उरगुंडे, राजाभाऊ आलापूरे यांच्यासह अनेकजण होते.
0 Comments