Latest News

6/recent/ticker-posts

विशेष: बचत गटाच्या महिलानेच केले कन्यादान; अनाथ दिपालीला मिळाली जगण्याची उमेद

बचत गटाच्या महिलानेच केले कन्यादान; अनाथ दिपालीला मिळाली जगण्याची उमेद


बचत गटाच्या उमेद अभियानातून झाले शुभमंगल



दिपाली शिंदे यांच्या विवाह प्रसंगी जमलेल्या निटूर मधील बचत गटाच्या सदस्या


निलंगा:(प्रतिनिधी) कोण म्हणतय जग निर्दयी आहे जगामध्ये आजही चांगूलपणा टिकवून ठेवणारे व मदत करणारे आहेत त्यात ग्रामीण भागामध्ये ही परोपकार करणाऱ्याची संख्या मोठी आहे त्यामुळेच तर अनाथ दिपालीच्या विवाहाला उपस्थित महीला व सहकार्य करणाऱ्या ची उपस्थिती आज होत असलेल्या विवाहावरून दिसते आहे. दिपाली शिंदे गाव निटूर जेमतेम आकरावी पर्यंत शिक्षण झालेलं आई वडील लहानपणीच मृत्यू पावले एक भाऊ आहे माञ दोन चार वर्षापासून पत्ताच नाही अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये दिपाली वाढली आकरावी पर्यंत शिकली आपल्या चुलत आजीकडे राहून ती लहानाची मोठी झाली चुलत आजीने सांभाळ करून दिपालीला मोठे केले खरे माञ तिच्या लग्नाची चिंता आजीला सतावू लागली अशातच दिपालीला देवंग्रा येथिल स्थळ लग्नासाठी आले व विवाह ही जमला.सध्या लाॕक डाऊन असल्या कारणाने विवाह समारंभ लहानच होत आहेत माञ मुलीचा विवाह म्हणजे खर्च आलाच त्यातच आई वडीलाचे छञ हरवलेले त्यामुळे दिपालीचा विवाह कसा होणार या चिंतेतच आजीने आपल्या नातीचा विवाह जमला आहे त्यासाठी कांही मदत करणार का असी विणवनी दिपालीच्या आजीने निटूर मधीलच जीवन ज्योती ग्रामसंघ व संघर्ष महीला ग्रामसंघ अंतर्गत बचत गटाच्या महीलाकडे केली तेंव्हा या महीलांनी तात्काळ होकार देवून सहकार्य करण्याचे ठरवले त्यावरून निटूरमधील बचत गटाच्या माध्यमातून काद्री लैलाबी, गोदावरी सुर्यवंशी, व शालूबाई शिंदे या महीलांनी पुढाकार घेवून बचत गट व गावातील अन्य लोकांचे सहकार्य घेवून दिपालीच्या लग्नासाठी लागणारे संसार उपयोगी सर्व साहित्य दोन ते चार दिवसामध्ये जमा केले त्यामध्ये सोन्याचे मंळसूञ व सर्व साहीत्य या महीलांनी जमा केले पन्नास हजार रूपयापेक्षा जास्त खर्च या महीलांनी करून सर्व साहीत्य दिपालीकडे सुपूर्द केले.आज २९ जून रोजी दिपाली आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात करत आहे देवंग्रा ता. औसा या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला संसारउपयोगी लागणारे सर्व साहीत्य देवून कन्या दान सुद्धा बचत गटाच्या महीलांनी केले त्यामुळे बचत गटाच्या या महीलांच्या सामाजिक उपक्रमाचे निटूरमध्ये कौतूक होत आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणालाही वेळ नाही माञ निटूर मध्ये बचत गटांनी मिळून केलेल्या कार्याचे कौतूक करावे तेवढे कमी आहे. 


दिपाली शिंदे यांची आजी माझ्याकडे आल्या व दिपालीच्या लग्नासाठी काही तरी मदत करा म्हणाल्या त्याच वेळी त्यांना होकार देवून बचत गटाच्या चालणाऱ्या उमेद अभियाणा अंतर्गत निटूर मधल्या बचत गटांना एकञ करून आम्ही दोन ग्राम संघ व बचत गटांनी पन्नास हजार रूपयापेक्षा जास्त संसार उपयोगी साहीत्य व लग्नाचा खर्च केला असल्याचे बचत गटाच्या लैलाबी काद्री यांनी सांगून या कामी गोदावरी सुर्यवंशी, शालूबाई शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले.


Post a Comment

0 Comments