लातूर ३४ पैकी ३१ निगेटिव्ह ३ पॉझिटिव्ह
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण ३४ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३१ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती माताजी नगर लातूर व दुसरी व्यक्ती कलंग गल्ली औसा येथील आहे व तिसरी व्यक्ती मदनसुरी निलंगा येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींपैकी मदनसूरी येथील ६५ वर्ष वय असलेला पुरुष रुग्ण अतिगंभीर अवस्थेत दिनांक १८.६.२०२० रोजी दुपारी २.०० वाजेच्या दरम्यान या रुग्णालयात दाखल झाला होता. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व दमा हे आजर पूर्वी बऱ्याच वर्षापासून होते. या व्यक्तीस ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता. तो दाखल झाल्यापासूनच व्हेंटिलेटरवर होता. त्याचा उपचारादरम्यान रक्तदाब व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खुप कमी झाल्यामुळे दिनांक १९.६.२०२० रोजी दुपारी १२.१० मि. मृत्यु झाला आहे अशी महिती डॉ. गजानन हलकंचे कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
0 Comments