राज्यात सलून आणि जीम सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई: कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. यामध्ये शाळा, सलून तसंच मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता २८ जूनपासून सलून आणि जीम सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलीये. राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सलून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली आहे. मात्र केवळ केस कापण्यासाठी सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय केस कापणाऱ्याने आणि कापून घेणाऱ्याने मास्क घालणं बंधनकारक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्युटीपार्लर, आणि स्पा अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल.लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला होता. सोशल डिस्टन्सिंग तसंच स्वच्छतेचे सर्व नियम पाळत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सलून चालकांकडून करण्यात येत होती.
0 Comments