लातूर - १ उदगीर- २ एकूण ३ कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण
लातूर ५२ पैकी ४७ निगेटिव्ह ३ पॉझिटिव्ह २ Inconclusive
जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन ने वाढली आहे. दोघांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे चार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण २७ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २५ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून त्या व्यक्तीचे वय ५० वर्षे आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली मोती नगर लातूर येथील रहिवाशी असलेले ६८ व ४६ वर्ष वयाचे दोन रुग्ण यांना आज दिनांक १७.६.२०२० रोजी पूर्णपणे बरे झाल्यामुले घरी सोडण्यात आले. त्यापैकी ६८ वर्ष वय असलेल्या महिला रुग्णाला उच्च रक्तदाब व दमा हा आजार होता तसेच कोविड-१९ मुळे त्यांना निमोनिया झाला होता. ही महिला रुग्ण १९ दिवस रुग्णालयात दाखल होती. त्यापैकी १२ दिवस ही महिला रुग्ण व्हेंटिलेटरवर होती. अतिगंभीर स्वरुपचा आजार व ६८ वर्षं वय असतानाही या रुगणने कोरोना वर मात केली आहे ४६ वर्ष वय असलेल्या रुग्णास उच्च रक्तदाब होता अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैदकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
0 Comments