Latest News

6/recent/ticker-posts

लेक्चर कॉलेनीच्या कॉर्नर जवळ अडविलेला रस्ता मोकळा करा एम आय एम ची मागणी

लेक्चर कॉलेनीच्या कॉर्नर जवळ अडविलेला रस्ता मोकळा करा एम आय एम ची मागणी



औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) येथील करीम नगर, एमआयडीसी, बिलाल नगर,समता नगर व हाशमी नगर कडे जाणारा रमोठा रस्ता लेक्चर कॉलेनी येथे अज्ञात व्यक्तीने अडविले आहे ते त्वरीत मोकळा करणे बद्दल एम आय एम च्या वतीने नगरपालिका चे मुख्याधिकारी यांना आज दिनांक २० जुन २०२० रोजी निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद केले आहे.औसा शहरातील नगरपरिषद हद्दीतील एक मोठया अल्पसंख्यांक समाज राहत असलेल्या ठिकाणी,करिमनगर , बिलाल नगर,समता नगर,कादरी नगर तसेच लातूर महामार्गाकडे जाणारा लेक्चर कॉलेनी कारनर रस्ता येथे मागील ब-याच दिवसांपासून अडविल्यामुळे त्या परिसरातील राहणा-या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथे राहणा-या नागरिकांना दोन किलोमीटर दुरुन सदर रस्त्याच्या पुढे जावे लागत आहे, तसेच एखाद्या रूग्णाच्या रूग्णवाहिणीसाठी किंवा अपंग व्यक्तींना हे रस्ता अडविल्यामुळे नाईलाजाने त्रास होत आहे.वास्तविक पाहता या परिसरात कोरोनाचा किंवा कंटेन्टमेट झोन शासनाकडून घोषीत करण्यात आलेला नाही.असे असताना लेक्चर कॉलेनी येथील काही लोक बेकायदेशीरपणे हा रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत आहेत.याबाबीचा विचार करून त्वरीत सदरील रस्ता मोकळा करा अन्यथा या परिसरातील नागरिकांनान्याय देण्यासाठी एम आय एम स्टाईलने सदरील रस्ता मोकळा करून रहदारीस मोकळा करुन घेण्यात येईल व वेळी काही अप्रिय घटना घडल्यास पूणपणे नगरपालिका जबाबदार राहील असा इशारा एम आय एम च्या वतीने या मागणी चे निवेदन दिले या निवेदनावर एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.


Post a Comment

0 Comments