Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहर-३ औराद शहा.-१ औसा-१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लातूर शहर-३ औराद शहा.-१ औसा(मालकोंडजी)-१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण


लातूर १०९ पैकी १०० निगेटिव्ह ५ पॉझिटिव्ह ४ Inconclusive



लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण ३४ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३० व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व २ व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती मोती नगर लातूर व दुसरी व्यक्ती अजिंक्य सिटी लातूर येथील आहे.महानगरपालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या ८ व्यक्तीच्या स्वबपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो व्यक्ती श्याम नगर लातूर येथील रहिवासी आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.पाच रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यापैकी २ रुग्णांना उच्च रक्तदाब व दमा हा आजार होता. सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण २८ रुग्ण भरती असून त्यापैकी ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व ७ रुग्ण ऑक्सिजन वर आहेत उर्वरीत १५ रुग्णाची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी महिती डॉ. गजानन हलकंचे कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.


Post a Comment

0 Comments