Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहर बस वाहतूक ५० टक्के क्षमतेने सामाजिक अंतर पाळून सुरू करा - पालकमंत्री अमित देशमुख

लातूर शहर बस वाहतूक ५० टक्के क्षमतेने,मास्क,सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर पाळून सुरू करा पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश


 


लातूर:( प्रतिनिधी) दि.१० - लातूर शहर महापालिका क्षेत्रातील शहर बस वाहतूक  सुरू करण्यात याव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, तसेच परिवहन समितीला दिले आहेत.अनलॉक एकच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून या बसेस सुरु करावयाच्या असून बसच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी या बसेस मध्ये प्रवास करू शकतील. प्रवाशांनी मास्कचा वापर करणे, हात सॅनिटराईझ करणे तसेच सामाजिक अंतर पाळणे हे नियम सक्तीने पाळावे लागतील.लातूर शहर बस वाहतूक लवकरात लवकर सुरू करावी, बसेसचे वेळापत्रक जनतेसाठी उपलब्ध करून द्यावे, बस थांबे निर्धारित करावेत त्याचप्रमाणे शहरालगतच्या गावांपर्यंत या सेवेचा विस्तार करावा अशा सूचनाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments