Latest News

6/recent/ticker-posts

माहेश्वरी पाटील चाकुरकर यांची चिञपट संघटनेच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड


 


 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) गृहीणी ते आज चिञपट संघटनेच्या प्रदेशाध्यक्षापदी चाकुर नगरीच्या सुनबाई माहेश्वरी पाटील चाकुरकर यांची निवड झाल्याबदल सर्वच क्षेञातुन त्याच्या वर अक्षरशा अभिनंदनांचा वर्षव होत आहे.उदगिर येथील सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माहेश्वरी पाटील आज चिञपट संघटनेच्या प्रदेशाध्याक्षा पदी विराजमान झाल्या त्यांचा हा प्रवास खरतर अतिशय खडतर व समस्यानी व्यापलेला होता.एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घ्यावा आणि महाराष्ट्राच्या सर्वाच्छ पदावर पोहचने तेही एका महिलेला ही बाब सामान्य नव्हतीच सध्या चाकुरकरांच्या सुनबाई असणाऱ्या माहेश्वरी पाटील यांच्या बाबतीत अल्पसा जीवन परिचय उदगीर येथील बाबासाहेब पाटील प.स.ईन्जीनिअर यांच्या कुटुंबात माहेश्वरी यांचा जन्म झाला.शालेय शिक्षण उदगीर येथे लालबहादुर शास्ञी विद्यालय उदगीर येथे झाला.१२ वी असताना अनिल पाटील चाकुरकर यांच्याशी त्यांचा विवाहझाला.मुळात शिक्षणाची आवड असणाऱ्या माहेश्वरी २ ते ३ वर्ष संसाराचा गाडा हाकण्यात गेला.पण त्या सारख्या माहेश्वरीवर येवुन पडला.त्यांचा पुर्णवेळ घरकाम आणि सासुबाईची सेवा करण्यातच जायचा कांही काळानंतर सासुबाई वारल्या त्यांच छतच पोरक झालं,त्याकाळात त्या फार नाराज राहायच्या दुःखाच्या सागरात त्या डुंबुन गेल्या मुलंही मोठी होत होती.त्यांनी स्वतःला सावरुन मुलाकडे लक्ष देण्याचे ठरवले.मोठा मुलगा केतन यांच्याकडे त्यांनी स्वतः लक्ष देऊन त्यांच्या शिक्षणासाठी त्या धडपडु लागल्या राञ-दिवस जागुन त्याचा अभ्यास घ्यायचा.सकाळी परत घरकाम करायचे अशी जबाबदारी त्या नियमित पाळायच्या त्याचा अभ्यास घेत असताना लेखनाचा छंद लागला आणि त्याही त्यांच्याबरोबर रोज लिखाण करायला लागल्या.त्या काळात त्यांनी एक कांदबरी लिहिली जीवनाची वाटचाल ती प्रकाशित झाली व तीच्या चांगल्या प्रति विकल्या गेल्या त्यांना त्यातुन आणखी उर्जा मिळाली आणि त्यांनी आपला मोर्चा लेखनाकडे वळवला.कांही दिवसांनी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना बॕगलोरला जाव लागल.बॕगलोर जात असताना त्यांना एका शेतकऱ्यांचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसला व त्याचा परीवार त्याला खाली काढण्यासाठी प्रतीक्षा करीत होता.आणि पोलीसांचा पंचनामा सुरू होता.ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली.दोन महिने सारखी त्यांना ती गोष्ट आठवत होती.त्या बेचैन व अस्वस्थ राहत होत्या.नेमक काय झाल असेल.मग त्यांनी बरयाच लोकाशी चर्चा केली व तो विषय समाजात मांडन्याचे ठरवले.व त्यावर लिखाण सुरू केले.त्यावेळी अविनाश कोलते यांनी त्यांची लिखाणात खुप मदत केली.आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित फास चिञपटांचे चिञीकरण पुर्ण केले.तो आता चिञपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.हा चिञपट करत असताना त्यांना बारयाच बड्या सिनेकालारांशी व इतर लोकांशी त्यांच्या ओळखी झाल्या.त्यांची वकृत्व कला व जिद्द पाहुन देवा ग्रुपने त्यांना चिञपट संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा या पदाविषयी विचारणा केली.तेव्हा सुरुवातीला त्या कांही बोलल्या नाही.पण सासरे बाबासाहेब पाटील समजावून सांगितले व प्रदेशाध्यक्ष या पदाची जिम्मेदारी सांभाळाला दिला.त्यांची पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सिने जगतातुन व राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, क्षेञातुन शुभेच्छांचा वर्षाव झाला.


आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुंटुबाची व्यथा फास या चिञपटांतुन त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.जेव्हा कर्जबाजारी शेतकरी कर्जाला कंटाळुन आपली जीवनयाञा संपवतो तेव्हा त्यांच्या मृतदेहा सोबत ही कशी आवस्था होते.हे विदारक चिञ त्यांनी आपल्या लेखनीतुन मांडला आहे.माहेश्वरी पाटील चाकुरकर यांनी शेतकरी आत्महत्या का?करतो यांच्या पडीकडे जावुन ते म्हणतात की,शाशनांच्या उपाययोजनाची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही.किंवा त्यांची अंमलबजावणी तंतोतंत होत नाही.यामुळेच आज शेतकरी आत्महत्या वाढत आहे.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


Post a Comment

0 Comments