Latest News

6/recent/ticker-posts

प्रत्येक व्यक्तीने योग-प्राणायाम करून आपली प्रतिकारशक्ती वाढवावी - जिल्हाधिकारी जी श्रीकांत

प्रत्येक व्यक्तीने योग-प्राणायाम करून आपली प्रतिकारशक्ती वाढवावी - जिल्हाधिकारी जी श्रीकांत


६ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फेसबुक लाइव्ह द्वारे योग-प्रणायमचे सादरीकरण


कोरोनाच्या अनुषंगाने डिजिटल पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


 



लातूर(प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या योग दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा प्रशासनाने फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटल पद्धतीने साजरा केला. भारतात प्राचीन काळापासून योग प्राणायाम प्रचलित आहेत. कोविड-१९ या साथ रोगाच्या अनुषंगाने आपली शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक व्यक्तीने दररोज योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थान परिसरातून सकाळी ७ ते ८ वाजता सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डाॅ विकास पाटील, डाॅ.विवेक कुलकर्णी,डाॅ.अतूल कुलकर्णी , डाॅ. मुजाहिद तसेच योग प्रशिक्षक श्रुतिकांत ठाकूर ,व्यंकट मुंडे, सोनाली मुस्कावाड आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की संपूर्ण जग,आपला भारत देश, महाराष्ट्र राज्य व लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या रोगावर सद्यपरिस्थितीत कोणते ही औषध उपलब्ध नाही, तर प्रतिकार शक्ती वाढवणे हाच त्यावर सध्याच्या परिस्थितीत परिणामकारक उपाय ठरत आहे. व शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवन्यासाठी भारतात प्राचीन काळापासून सुरु असलेली योग प्राणायाम ही पद्धत अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज नियमितपणे योगासने करावीत व कोणत्याही प्रकारच्या आजाराला दूर ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आयुर्वेदिक डॉक्टर विवेक कुलकर्णी यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढायची माहिती दिली. त्यामधील घटक कोणते व तो काढा कशा पद्धतीने बनवायचे याची सविस्तर माहिती सांगितली. तर होमिओपॅथी डॉक्टर अतुल कुलकर्णी यांनी आर्सेनिक अल्बम हे औषध वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये असे आव्हान केले तर युनानी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुजाहिद यांनी युनानी वैद्यकीय पद्धत हे भारतात प्राचीन काळापासून वापरली जात असून शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले.फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आयुष विभागाच्यावतीने डॉक्टर विवेक कुलकर्णी, डॉक्टर अतुल कुलकर्णी व डॉक्टर मुजाहिद यांनी भारताच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धतीची माहिती नागरिकांना दिली. या माध्यमातून नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवावी असे आवाहन केले. तसेच नियमितपणे योगासने करण्याची सूचनाही त्यांनी केली.यावेळी योग प्रशिक्षक श्रुतिकांत ठाकूर, व्यंकट मुंडे यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत व योग शिक्षिका सोनाली मुस्कवाड यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध योगासने व प्राणायाम करून घेतले व जिल्ह्यातील नागरिकांनी हे नियमितपणे या पद्धतीने योगासने व प्राणायाम करावेत असे आवाहन केले. प्रारंभी जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांनी सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगितले व आजच्या दिवशी एक दिन साजरा करण्याचा उद्देशही स्पष्ट केला.सहावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.


Post a Comment

0 Comments