Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत तर्फे आशाताईंना कोरूना किट व सॅनिटायझर वाटप

ग्रामपंचायत तर्फे आशाताईंना कोरूना किट व सॅनिटायझर वाटप 


केळगाव:(प्रतिनिधी/ वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत ग्राम स्तरावर जाऊन घराघरांमध्ये कोरोनापासून बचाव करण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य सेविका आशा ताईं जात आहेत. संसर्गचा प्रभाव व त्यापासून बचाव करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातुन आशा ताईंना आरोग्य विषयक साहीत्य देण्यात आले यामध्ये प्रत्येकी आशा ताईंना २५ लिटर सँनिटाईझर,ट्रीपल लेअर मास्क ५०० नग.,हेवी ड्युटी ग्लोज २०जोडी,फेस शिल्ड १० नग, थर्मल स्कॅनर १ नग,प्लस आँक्सोमीटर १ नग तसेच आरोग्य उपकेंद्रास ग्लुकोमीटर १ नग आणि अंबुबँग १ नग देण्यात आले याप्रसंगी सरपंच शकील पांढरे, ग्राम विकास अधिकारी मुक्तापुरे व्ही.एन.,उपसरपंच बाबुराव राठोड, माजी सरपंच ,समद पांढरे, ग्रा.प.सदस्य शौकत पठाण, तंटा मुक्ती चे उपाध्यक्ष दत्ता काळे, डॉ.सारगे सर, विलास गवारे, सर्व आशा ताई, आदीजन उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments