लातूर-३ निलंगा-१ उदगीर-१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५१ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, ५ अहवाल पॉझिटिव्ह तर चार अनिर्णीत
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३ उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३० व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक १४ जून २०२० रोजी एकूण ६० व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यातील ५१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर ४ व्यक्तींचे आवाहल अनिर्णीत आहेत, अशी माहिती संस्थेचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३१ व्यक्तीच्या स्वबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यातील १ रुग्ण मोती नगर, १ रुग्ण भुसार लाईन येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व सरस्वती कॉलनी औसा रोड लातूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. लातूर शहरातील एकूण ३ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून तीन व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ती व्यक्ती नूर पटेल कॉलनी उदगीर येथील आहे तर निलंगा येथून दोन स्वाब तपासणीसाठी आलेले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असून ती व्यक्ती चांदोरी तालुका निलंगा येथील असून उर्वरित एक अहवाल अनिर्णित आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे.बाभळगाव येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तीचे स्वाब कोविड केअर सेंटर एम. आय. डी. सी. लातूर येथुन तापसणीसाठी आले होते त्यापैकी २० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे.जिल्ह्यात आज रोजी पर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३ उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३० व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८ असून आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९१ इतकी आहे.
0 Comments