लातूरच्या पुर्व भागाचा चेहरा मोहरा बदलतोय
लातूर:(प्रतिनिधी) लातूर मधील पुर्व भाग भरपूर वर्षापासून रस्ते, डिवाइडरच, पथदिवे यापासून वंचित होता. मात्र आता पुर्व भागाचा चेहरा मोहरा बदलताना दिसुन येत आहे.महिला तंत्रनिकेतन ते गरूड चौक पर्यंत नवीन रोडचे काम चालू आहे. काही दिवसांपूर्वी या कामावर उमेश कांबळे यांनी ताशेरे ओढले होते सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत होते मात्र गुत्तेदारानी रस्ता बनवण्याचा दर्जा बदलेला असुन काम पध्दतीचे होत असल्याचे दिसून येत आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक ते गरूड चौक नवीन डिवाइडरचे काम होत आहे. भरपूर वर्षापासून पुर्व भागात सोई सुविधा नव्हत्या मात्र आता पुर्व भागात बदल घडत असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments