Latest News

6/recent/ticker-posts

चिंता वाढली: लातूर १२८ पैकी १५ पॉझिटिव्ह,एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ,आज १२ रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी

चिंता वाढली: लातूर १२८ पैकी १५ पॉझिटिव्ह,एका  ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ,आज १२ रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी



लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण ६८ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५५ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ३ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या  ४ व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अहमदपूर येथिल २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही आनंदाची बाब आहे. आज उदगीर  येथे एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू या रुग्णाला डायबिटीज व हायपर टेंशन चा त्रास होता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील ०७ रुग्णांची प्रकृती पुर्ण पणे बरी झाल्यामुळे आज त्यांना सुट्टी करण्यात आली आहे. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व तो  रुग्ण १२ दिवस अतिदक्षता विभागात होता. तीन रुग्णांना गंभीर स्वरुपचा आजार होता. त्यांचे वय ५०, ५२ व  ६५ वर्षे होते.तसेच इतर चार रुग्णांना सौम्य स्वरुपाचा आजार होता सदर रुग्ण २२ ते ६५ वर्षे वयोगटातील होते त्यात ५ पुरुष २ स्त्री रुगण होते. यात एका गर्भवती महिलेचा समावेश होता व त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली आहे. या ७ रुग्णांपैकी लातुर शहरातील ४ रुग्ण व ग्रामीण भागातील ३ रुग्ण आहेत अशी माहिती डॉ. किरण डावळे यांनी दिली.  यावेळी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे उपस्थित होते.


 आज १२ रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी


लातूरासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७,   उपजिल्हा रुग्णालय निलंगा १ व उपजिल्हा रुग्णालय उदगीर ४ अशा एकूण १२ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज बाभळगाव ३, मोतीनगर १, जुनी कापड लाईन २ व भुसार लाइन १ असे ७ रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथून १ तसेच उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील किंनी ३ व नोबेल कॉलनी १ असे ४ याप्रकारे लातूर जिल्ह्यातून १२ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments