लातूर १३१ पैकी ११२ निगेटिव्ह ९ पॉझिटिव्ह १० Inconclusive
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण ५५ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून २ व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती गवळी नगर लातूर येथील आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथून २२ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली ७८ वर्ष वयाची व्यक्ती अजिंक्य सिटी येथील रहिवासी आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.तीन रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण २७ रुग्ण भरती असून त्यापैकी अतिदक्षता विभागात एकूण १४ रुग्ण असून त्यामध्ये ४ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६ रुग्ण ऑक्सिजन वर आहेत व इतर ४ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच कोरोना विलगीकरण कक्षातील इतर १३ रुग्णाची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी महिती प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. गजानन हलकंचे डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.
0 Comments