लातुर ३७ पैकी २८ निगेटीव्ह, १ Inconclusive, ८ पॉझिटीव्ह
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक ९.६.२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण ३७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे व ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यापैकी प्रत्येकी एक रुग्ण टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर, खाडगाव रोड लातूर शहर येथील आहेत.लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथील १, औसा तालुक्यातील अंधोरी येथील १, चाकूर तालुक्यातील सुगाव येथिल १ व उदगीर शहरातील सराफ लाईन येथील एका व्यक्तीच्या समावेश आहे.यातील एका रुग्णांची ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली असून २ व्यक्तींना किडनीचे आजार आहेत व एका ३६ वर्षीय रुग्णाचे ४ वर्षांपूर्वी किडनी Transplant झालेले आहे व तो डायलिसीस वर आहे उर्वरित ४ रुग्णांना कोरोना (कोविड-१९) ची लक्षणे आहेत अशी माहिती कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. असे लातूर जिल्ह्यातील एकूण ३७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे व ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
0 Comments