लातूर १२७ पैकी ११२ निगेटिव्ह ७ पॉझिटिव्ह ८ Inconclusive
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण २३ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी १८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून एक व्यक्ती सुतमिल रोड लातूर येथील आहे व एक व्यक्ती माळकोंडजी ता. औसा येथील आहे. महानगरपालिके कडून तापसणीसाठी आलेल्या स्वब पैकी एका व्यक्तीचा पॉझिटिव्ह आला असून ती व्यक्ती जुनी कापड लाईन लातूर येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.दिनांक ३.५.२०२० रोजी रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील एकाच कुटुंबातील ५० व ४० वर्ष वयाचे दोन्ही रुग्ण या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व दोघेही १२ दिवस अतिदक्षता विभागात होते. त्या दोन्ही रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांची आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैदकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.
0 Comments