Latest News

6/recent/ticker-posts

चिंता वाढली: लातूर ९३ पैकी ८१ निगेटिव्ह १० पॉझिटिव्ह २ Inconclusive

लातूर ९३ पैकी ८१ निगेटिव्ह १० पॉझिटिव्ह २ Inconclusive


लातुर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण २० व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी १८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती जुनी कापड लाईन, लातूर येथील असून त्यांचे वय २२ वर्ष दुसरी व्यक्ती आंधोरा ता. औसा येथील असून त्यांचे वय ५५ वर्षे आहे दिनांक १५.६.२०२० रोजी कासारशिरसी येथील प्रलंबित असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उमापूर जी. बिदर, कर्नाटक राज्य येथील २ रहिवासी वय २१ व ३० वर्षे यांची दिनांक २९.५.२०२० रोजी उमापूर येथून तपासणी करण्यात आली होती दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना या संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्यांची दिनांक १५.६.२०२० रोजी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यामुळें त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments