लातूर ११२ पैकी ८८ निगेटिव्ह १४ पॉझिटिव्ह १० Inconclusive एका रुग्णाचा मृत्यू
मृत रुग्णाची संख्या 15 झाली.
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण ३५ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २४ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ६ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या २ व्यक्ती नारायण नगर, मजगे नगर, शाम नगर येथील व एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. महानगरपालिकेकडून २९ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २३ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ५ व्यक्ती दयाराम रोड व एक व्यक्ती शाम नगर लातूर येथील आहे उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील ५ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली एक व्यक्ती येरमे नगर येथील आहे व दुसरी व्यक्ती अर्सनाल ता. उदगीर येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
0 Comments