उगवण झाले नसलेल्या सोयाबीनचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी - आ.अभिमन्यू पवार
दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खत कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावे.
औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) उगवण क्षमता नसलेल्या बियाणेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.याप्रकरणी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.याचबरोबर दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे व खत कृषी विभागाने मोफत उपलब्ध करून द्यावे व संबंधित उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आ.अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांच्याकडे केली आहे.औसा व निलंगा तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांचे व घरगुती बियाणे खरेदी करूनसोयाबीनसह खरीप हंगामातील इतर पिकांची पेरणी केली.पेरणी पुर्ण होऊनही सात ते आठ दिवस उलटूनही जे सोयाबीन चार ते पाच दिवसात उगवते ते उगवले नाही.अनेक शेतकऱ्यांचे मान्यताप्राप्त कंपनीचे खरेदी केलेले बियाणे उगवले नाही.त्यामुळे उगवण क्षमता नसलेले बियाणे विक्रीसाठी आल्याचे निर्देशानास आले असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.याबाबत औसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती व कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली असून याबाबत अद्याप पंचनामे करण्यात येत नाहीत.उगवण क्षमता नसलेल्या बियाणेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे कृषी विभागाने या शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यामुळे कृषी विभागाने सोयाबीन बियाणे प्रकरणी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी.संबधित शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे व उगवण क्षमता नसलेल्या निकृष्ठ दर्जाच्या बियाणे विक्री केल्याप्रकरणी संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व जिल्हा कृषी अधीक्षक याच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
0 Comments