औसा तहसील कार्यालयात दलालाचा सुळसुळाट बंद करण्याची एम आय एम ची मागणी
औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) एम आय एम पक्ष ता औसा जि लातूर च्या वतीनं आज दी. २३ / 0 ६ / २०२० रोजी औसा तहसील कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट त्वरित बंद करावे या मागणीसाठी तहसील कार्यालय औसा येथे निवेदन देण्यात आले या मध्ये प्रमुख मागणी करण्यात आली की सध्या संजय गांधी निराधार व श्रावण बाळ,जेष्ठ नागरिक, विधवा, अपंग व राशन काड्, शालेय विध्यार्थ्यांना लागणारे कागद ईत्यादी कामासाठी तहसील कार्यालयातील दलालांनी आपला धंदा जोमाने सुरुवात केले असून साधारणता या प्रत्येक कामाच्या मोबदल्यासाठी गोरगरीब जनतेकडून २५०० रु ते ३००० रुपये पर्यंत आथिर्क पिळवणूक दलाल करत असुन या दलालांना वेळीच पायबंद घालावे तहसील योग्य ती कठोर कार्यवाही करावी व औसा तहसील कार्यालयातील दलाल यांना कायमच बंदी घालण्यात यावी जेणेकरून गोरगरीब जनतेची आथिर्क लुट होणार नाही यांची दखल घ्यावी अन्यथा या दलाच्या विरोधात कायदेशीर पध्दतीने त्तिर्व अंदोलन करण्यात याईल असा ईशारा निवेदनात दीला असुन या मागणीच निवेदन देताना एम आय एम पक्षाचे माजी लातुर जिल्हाउपाध्यक्ष अँड.गफुरूल्लाह हाशमी, एम आय एम प्रमुख औसा अल्हाज सय्यद मुजफ्फर अली ईनामदार, एम आय एम युवानेते सय्यद कलिम,एम आय एम माजी शहरअध्यक्ष औसा शेख मुजम्मील, एम आय एम न न्यामत लोहारे, सय्यद आमीन, अस्लम नवाब, शकील देशमुख, अजहर कुरेशी सय्यद जमीर ईत्यादी एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments