Latest News

6/recent/ticker-posts

विधी शाखेचा विद्यार्थी असलेल्या मोहम्मद उस्मान यांची अनोखी कामगिरी

विधी शाखेच्या विद्यार्थ्याने बनविले अनोखे सॅनिटायझर मशीन


विधी शाखेचा विद्यार्थी असलेल्या मोहम्मद उस्मान यांची अनोखी कामगिरी


नांदेड:(प्रतिनिधी/सागर तापडिया) लॉकडाऊन काळात केवळ मोबाईलवर टाईमपास करण्याऐवजी ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात संधी शोधत नांदेडचा मोहम्मद उस्मान या विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने सॅनिटायझर मशीन’ची निर्मिती केली आहे.कोरोनाच्या काळात ऑफिसला जा नाही तर दुकानात घरी असा किंवा अन्य ठिकाणी कोठेही सॅनिटायझर वापरावे लागते पण हाताने बॉटलला हात लावावे लागत असल्याने परत संसर्गाचा धोका आलाच मोहम्मद उस्मान यांनी बॉटलला स्पर्श टाळून काही करता येईल का हा विचार केला व त्यांनी त्या दिशेने संशोधन सुरू केले व सार्वजनिक ठिकाणी वापरात येईल असे ऑटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन बनवण्याचे ठरवले व सदरील मशीनमध्ये सेंसर लावून स्पर्श टाळण्यासाठी शक्कल लढवली मशीन खाली हात नेताच प्रमाणबद्ध ३ ml सॅनिटायझर पडेल अशी व्यवस्था मशीन मध्ये केली सार्वजनिक स्थळावर वापरायोग्य ५ liter क्षमतेचे ३ ml प्रतिव्यक्ती प्रमाणे ज्यामध्ये १७०० लोक हॅन्ड सिनेटाइज करतील असे ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर मशीन १७ दिवसांत बनवले जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी हाताचा स्पर्श न करता हॅन्ड सिनेटाईज करता येईल जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल व लोकांचे आरोग्य चांगले राहील.असे आहे तंत्रज्ञान:- या ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनच्या निर्मितीसाठी Poly-vinyl-chloride plastic, sensor अशा अनेक उच्च तंत्रज्ञानाचा यात उपयोग केला आहे व ते कार्यान्वित होण्यासाठी विजेचा पुरवठा देण्याची सोय केली आहे. ह्या मशीन खाली हात नेताच ३ ml सॅनिटायझर आपोआप हातामध्ये पडते.World health organization(WHO)च्या गाईडलाईन्स नुसार ३ml ने हात धुवावे तर चांगल्या पद्धतीने हात स्वच्छ होतो. एकदम सुरक्षित नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सोपे अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. सरकारी/ खाजगी कार्यालय,कॉलेज, शाळा,कोर्ट, दुकान ,बँक ,मॉल ,कंपनी, यासह जेथे जेथे जास्त वर्दळ आहे अशा सार्वजनिक ठिकाणांवर हे ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन अत्यंत उपयुक्त आहे लवकरच या सॅनिटायझर मशीनचा स्टार्टअप सुरू करावा असा मोहम्मद उस्मान यांचा विचार आहे.


Post a Comment

0 Comments