जेष्ठ नागरिकांची होणार तपासणी ग्रामपंचायतचा उपक्रम
निटूर:(प्रतिनिधी) गावात असणाऱ्या ५५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकाची आशा वर्कर,अंगणवाडी सेविका मार्फत घरोघरी तपासणी होणार यासाठी टीम पूर्णपणे सज्ज झाली असून सुरक्षित पणे हे काम करणार आहेत, यासाठी ग्रामपंचायत कार्यालय कडून सर्व आवश्यक साहित्य आढावा बैठकीत वाटप करण्यात आले.प्लसऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, फेस शिल्ड, सनिटायझर, मास्क इ साहित्य देण्यात आले. लॉकडाऊन ५ मध्ये शिथिलता मिळाली म्हणजे कोरोना संपला या भ्रमात राहू नका आताच अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. गावातील अँटी कोरोना फोर्स ने चेक पोस्ट तात्पुरते बंद केले आहे. तर मास्क न वापरता फिरणाऱ्याची संख्या वाढली आहे सर्वांनी स्वतः नियमाचे पालन करावे. दुकानदाराने सनिटायझर ठेवा,मास्क वापरा, फिजिकल डिस्टनस ठेवा.ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी करता येणाऱ्या टीमच्या कामात सहकार्य करावे ज्यामुळे सर्व जेष्ठना कोरोना पासून दूर ठेवण्यास मदत होईल आपण सुरक्षित तर आपलं गाव सुरक्षित तरी ग्रामपंचायत कार्याला सहकार्य करावे असे अहवान सरपंच परमेश्वर हासबे यांनी केले आहे.
0 Comments