Latest News

6/recent/ticker-posts

आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते औसा येथील नूतन बस स्थानकाचे भूमिपूजन

आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते औसा येथील नूतन बस स्थानकाचे भूमिपूजन


एका वर्षात काम पुर्ण करण्याचे उद्दिष्ट


औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) येथील नूतन बस स्थानकाचे भूमिपूजन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते दि.१५ जून रोजी करण्यात आले. तालुक्यातील विस्तारित लोकसंख्या व भौगोलिक भागाचा विचार करून याठिकाणी सुसज्ज असे बस स्थानक उभारण्यात येणार आहे.यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी या अगोदरच पाठपुरावा केला होता.दरम्यान या नूतन बस स्थानक कामाचे भूमिपूजन सोमवारी संपन्न झाले असून एका वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झालेल्या या भूमीपुजन कार्यक्रम प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,संतोषअप्पा मुक्ता,भाजपचे शहराध्यक्ष लहू कांबळे,पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेख अहमद,नगरसेवक गोपाळ धानूरे,भिमाशंकर राचट्टे, अॅड. अरविंद कुलकर्णी, अॅड. हाश्मी,हिमायत पटेल,आगार व्यवस्थापक अजय गायकवाड,कनिष्ठ अभियंता फलटणे,विभागीय अभियंता जगदीश कोकाटे,टिपन्नअप्पा राचट्टे,संदीप जाधव,कल्पना डांगे,भिमाशंकर मिटकरी,संजय कुलकर्णी,राजकिरण साठे अच्युत पाटील,खुनमिर मुल्ला,फयुम शेख,इम्रान सय्यद, भंडारी आदीसह प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. औसा शहरात प्रवासाच्या सोईसुविधा लक्षात घेवून एका नव्या बस स्थानकाची उभारणी व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता. सुमारे ४ कोटी २२ लाख रुपयांचे बस स्थानक उभारण्यात येत असून चौदाशे स्केफुट जागेवर उभारण्यात येत असलेल्या या बस स्थानकात सुसज्ज कार्यालयीन इमारत, शौचालय, संपुर्ण बस स्थानक परिसर सिमेंट काँक्रिटयुक्त राहणार आहे.एकाच वेळी बस स्थानकात चौदा बस थांबतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर बस स्थानकाला संरक्षण भिंत राहणार आहे.दरम्यान अवघ्या एक वर्षात या नूतन बस स्थानकाचे काम पुर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम केले जाणार आहे. एकंदरीत नवीन बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सोईसुविधा मिळणार असून औसा शहरातील व्यवसाय वाढीला मदत मिळणार आहे. 


Post a Comment

0 Comments