Latest News

6/recent/ticker-posts

लातुर ५४ पैकी ५१ निगेटीव्ह ३ पॉझिटीव्ह

लातुर ५४ पैकी ५१ निगेटीव्ह ३ पॉझिटीव्ह



लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक ५.६.२०२० रोजी लातुर जिल्हयातील एकुण ५४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पाझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्ती जीवन आशा इमारत नरहर कुरुंदकर मार्ग भाग्य नगर लातूर येथील रहिवासी असून त्यांना ताप, खोकला व दम लागत असून त्यांना शुगरचा आजार आहे. ४ जून रोजी सांगली येथून प्रवास करून आलेले आहेत. दिनांक ४.६.२०२० रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन २ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच २ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापुर येथील ९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. औसा येथील २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण ५४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ५१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments