Latest News

6/recent/ticker-posts

औसा जमीयत-ए- उलेमा हिंदच्या वतीने न्यूज 18 वर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

औसा जमीयत-ए- उलेमा हिंदच्या वतीने न्यूज 18 वर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी 



औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या बद्दल अपवादक टिपणी करणाऱ्या न्यूज 18 वर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी जमीयत-ए- उलेमा औसा यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.या निवेदनात असेही म्हटले आहे की सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती याच्या कबुली जबाबु विरुध्द, न्यूज 18 channel वाहिनीचे अँकर अमीश देवगण १५/६/२०२० रोजी संध्याकाळी ७.३० वाजता आले.अक्रांत चिश्ती आली, लोटेरा चिश्ती आली, यानंतर त्यांनी धर्म बदलला अशा अपमानकारक धर्मामुळे त्यांच्या प्रियजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशा बातमी 18 वाहिनीवर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि अँकर आमिशवर कठोर कारवाई केली जावी, अशा मागणीचे निवेदन जमीयत-ए- उलेमा हिंद औसाच्या वतीने औसा तहसिलदार मार्फत दि.१८ जुन २०२० रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनावर अध्यक्ष मौ .अमजद सिद्दीकी, शहराध्यक्ष मौ. मुसा कसमी ,नगरसेवक मुजाहिद शेख, माजी नगरसेवक शकील शेख ,सय्यद मुजफ्फर अली इनामदार, अ‍ॅड सिकंदर पटेल अ‍ॅड एफ एस पटेल, अ‍ॅड मजहर शेख, बासीद शेख अॅड. एकबाल शेख आदींची निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.


Post a Comment

0 Comments