Latest News

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह, एका रूग्णाचा मृत्यू, 16 रुग्णांना सुट्टी

जिल्ह्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह, एका रूग्णाचा मृत्यू, 16 रुग्णांना सुट्टी


जील्ह्यातील ६९ व्यक्तींच्या स्वाबपैकी ५८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह


३ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर ७ अनिर्णीत एका रूग्णाचा मृत्यू


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर


आज एकूण १६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६२, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७४ व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३


लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकूण ६९ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ५८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , ३ नवीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  एका व्यक्तीची १४ दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ७ व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर असून ते दिनांक १० जून २०२० रोजी मुंबई येथून प्रवास करून आले असून मागील सात दिवसापासून ते कर्त्याव्यवर उपस्थित नव्हते.(त्यांचा Duty Off होता ) तीन दिवसापासून सर्दी व ताप आल्यामुळे सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवू  लागल्यामुळे त्यांची आज तपासणी केली असता त्यांचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज जिल्ह्यात नवीन ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.


गाजीपुरा येथील एका रूग्णाचा मधुमेह व उच्चरक्तदाबाने मृत्यू


 दि.२४ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतेच्या रुग्णालयात दिनांक २३ जून २०२० रोजी ३८ वर्षे वय असलेला गाजीपुरा येथील एक रुग्ण खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातुन वर्ग केल्यामुळे या रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर कृत्रिम श्वासनलिकेसहीत सकाळी ८.३० वाजता दाखल झाला होता व या रुग्णाचा तात्काळ कोरोना (कोविड-१९) तपासणीसाठी स्वॅब घेतला होता.हा रुग्ण कोरोना विलगीकरण कक्षात भरती असताना उपचारादरम्यान दिनांक २३ जून २०२० रोजी रात्री ९.०० वाजेच्या दरम्यान Diabetic Ketoacidosis व Sepsis यामुळे  मृत्यु झाला. यासंबधी पोलिस विभगास दिलेल्या (Police Inform Book) अहवालात मृत्युचे कारण हे Diabetic Ketoacidosis, Septic Shock, Known case of Diabetis Mellitus (मधुमेह)  and Hypertention (उच्च रक्तदाब) हे नमूद केले आहे.या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल दिनांक २३ जून २०२० रोजी सायं ६.०० वाजता प्राप्त झाला व तो अनिर्णयीत (INCONCLUSIVE) होता. अनिर्णयीत (INCONCLUSIVE) असलेले बहुतांशी अहवाल ४८ तासानंतर पुनर्तपासणी केल्यास पॉझिटीव्ह येतात. त्यामुळे कोरोना (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन अशा रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आहे असे समजुण या रुग्णाच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यासाठी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे महानगरपालिकेकडे सापेविण्यात आले होते.


आज एकूण 16 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी


आज लातूर जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक दिवस असून जिल्ह्यातून १६ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून हनुमान नगर चे ६ रुग्ण,  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाभळगाव २, हिप्परगा १, भाग्यनगर १ व भुसार लाईन चा १ असे एकूण ५ रुग्ण, आतिरिक्‍त एमआयडीसी मध्ये १००० मुला मुलींच्या वसतिगृहात निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटर मधून क्रांतीनगर चे २ व चौधरी नगर चा १ असे ३ रुग्ण व दापका तालुका निलंगा येथील कोविड केअर सेंटरमधून २ रुग्ण असे एकूण आज १६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६२, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७४ व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३ अशी आहे.


Post a Comment

0 Comments