Latest News

    Loading......

प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्याने मागितली माफी

प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्याने मागितली माफी



लातूर:(प्रतिनिधी) दि. २७ - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबूक च्या माध्यमातून टीका करण्यात आली होती. मसलगा ता. निलंगा जि. लातूर या ठिकाणी राहणारा प्रवीण जाधव या तरुणाने फेसबुकवर बाळासाहेबांबद्दल वादग्रस्त टीका केली होती. याची माहिती मिळताच लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष युवराज योगी यांनी संबंधित तरुण राहत असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधला. पोलीस पाटील, सरपंच त्या मुलाचे वडिल या व्यक्तींना फोनवरून घटनेची माहिती दिली. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी प्रवीण जाधवला गावासमोर बोलावून घेतले. गावातील लोकांनी प्रवीण जाधवला जाब विचारून व्हिडिओ तयार करून माफी मागायला सांगितली. फेसबूकच्या माध्यमातून जी टीका केली त्या गावचे पोलीस पाटील सरपंच आणि सर्व गावातील मंडळीं समोर प्रवीण जाधव याने व्हिडिओ तयार करून बाळासाहेबांची माफी मागितली. लातूरच्या सर्व कार्यकर्त्यानी फेसबुकवर बाळासाहेबांच्या विरोधात पोस्ट पाहिल्यानंतर रात्रभर प्रवीण जाधवची माहिती घेऊन सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाईला सुरवात केली, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच प्रवीण जाधव याने माफी मागितली.


Post a Comment

0 Comments