Latest News

6/recent/ticker-posts

शिवराज्याभिषेक दिन व आहिल्याबाई होळकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिन व आहिल्याबाई होळकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर



उमरगा:(प्रतिनिधी/वजीर शेख) नारंगवाडी सेवा समुह व जिजाऊ ब्रिगेड उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिन व आहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून करोना सारख्या महामारीतुन राज्याला व देशाला बाहेर काढण्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे हे लक्षात घेऊन ऊस्मानाबाद जिल्ह्यातील नारंगवाडी गावातील व परिसरातील युवकांच्या सहभागातून रक्तदान शिबीर घेण्यात आले दि. १६/६/२०२० रोजी शिबिराचे आयोजन नारंगवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नारंगवाडी सेवा समुहाचे अध्यक्ष शिवश्री विठ्ठलराव चिकुंद्रे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील युवकांनी रक्तदान शिबिराला उत्सपुर्त प्रतिसाद दिला.रक्तदान शिबीराचे उद्घाटन डॉ. पंडीत पुरी (उपजिल्हा रुग्णालय उमरगा) प्रमुख उपस्थिती बाबा जाफरी (सामाजिक कार्यकर्ते),अड. शितल चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते),शिवमती सारिका ताई अंबुरे (जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव),डॉ. उमाकांत पवार, शिवश्री भास्कर वैराळे (जिल्हा सचिव मराठा सेवा संघ),शेखर घंटे ( जिल्हा परिषद सदस्य),शिवमती रेखाताई पवार (तालुका अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड),शिवमती सुनंदाताई माने (उपजिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड),शिवमती कवीताताई चव्हाण (सरपंच नारंगवाडी),शिवमती मंजुषाताई चव्हाण (सचिव जिजाऊ ब्रिगेड),शिवश्री धनंजय दळवे (उपसरपंच नारंगवाडी),हेमंत पाटील (पोलीस पाटील नारंगवाडी),संजय पवार, जगदीश जाधव (ग्रामसेवक),मोहनराव जाधव, शिवश्री अमोल चव्हाण, रामभाऊ कारभारी आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments