जिल्ह्यात दोन दिवसात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू
लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दिनांक ६.६.२०२० रोजी औसा तालुक्यातील एक स्त्री रुग्ण मुंबईवरुन प्रवास करुन आली असल्यामुळे व त्यांना खोकला, सर्दी, दम लागत असल्यामुळे या रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाल्या होत्या. सदर रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासुन व्हेंटीलेटर वर होत्या त्यांचा उपचारादरम्यान दिनांक ११.६.२०२० रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान मृत्यु झालेला आहे.
तसेच एक रुग्ण इतर ठिकाणच्या अतिदक्षता विभागात मागील ३ दिवसापासुन उपचार घेत होता त्याची प्रकृती खालावल्यामुळे ७० वर्षीय रुग्णांस दिनांक ११.६.२०२० रोजी पुढील उपचारासाठी या रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. सदर रुग्ण या रुग्णालयात दिनांक ११.६.२०२० रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान गंभीर अवस्थेत दाखल झाला होता. या रुग्णास पुर्वीपासुनच मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्दयविकाराचा आजार होता. पाच वर्षापुर्वी त्यांचे बायपास चे ऑपरेशन झाले होते. सदर रुग्ण दाखल झाल्यापासुन व्हेंटीलेटर वर होता त्यांचा उपचारादरम्यान दिनांक १२.६.२०२० रोजी (मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान) मृत्यु झालेला आहे. अशी माहिती डॉ. राजेश बोबडे, डॉ. किरण डावळे, डॉ. राम मुंढे, डॉ. मारुती कराळे व प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ.निलिमा देशपांडे यांनी दिली.
0 Comments