सरपंच सेवा संघ लातूर जिल्हा समन्वयक पदी गोविंदराव निकम यांची निवड
औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम ) महाराष्ट्रात सरपंच सेवा संघ ची स्थापना करण्यात आली असून या संघटनेची विभागीय बैठक नुकतीच औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून या मध्ये लातूर जिल्हा समन्वयक पदी पत्रकार गोविंदराव निकम यांची निवड करण्यात आली आहे. सध्या देशासह महाराष्ट्रात लॉक डाऊन असल्या कारणाने सरपंच सेवा संघाचे संस्थापक सचिव बाबासाहेब पावसे पाटील यांनी सोशल मीडिया द्वारे नियुक्ती पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. सदर निवडीचे नियुक्ती बद्दल जिल्ह्यातील विविध गावाच्या सरपंच उपसरपंच जिल्ह्यातील पत्रकार बंधूंनी अभिनंदन केले आहे.
0 Comments